Resorts near Kolhapur, Holiday Resort in Amba near kolhapur | About Us

In 1660 Sardar Krishnaji Gaikwad who was Loyal Sardar in Ch. Shivaji Maharaj Darbar. He was Bistod with a Honour of "Vishvasrao."


12th Generation Mr. Udaysing Gaikwad who is now head of our Gaikwad Family. He was Member of Parliament & Minister in Maharashtra Government for 25 Years from Kolhapur. He was also a known Hunter & Written a Book "TROPHIES" on Hunting & Conservation. His Son Mr. Mansing Gaikwad has own Stud farm where you can see & buy Best of Indian Horses.


 

आमच्याविषयी थोडसं .

" सवाई मानसिंग रिसोर्ट " कोल्हापूरातील एक राजेशाही आणि खानदानी घराणे म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते, अशा मा. श्री. उदयसिंह गायकवाड यांच्या परिवारातील उद्योगाचा एक भाग आहे. मा. श्री. उदयसिंह गायकवाड यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार या नात्याने २५ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच या परिसरामध्ये एक निष्णात शिकारी अशी त्यांची ओळख आहे. साधारण १९५० ते १९८० या कालखंडातील त्यांच्या अनुभवावर त्यांनी शिकार तसेच संवर्धन या विषयावर " ट्रॉफिज " हे पुस्तक लिहिले आहे.


मा. श्री. उदयसिंह गायकवाड यांनी राजेशाही थाटाचा " सवाई मानसिंग रिसोर्ट " हा प्रकल्प सुरु केला आहे. यांचा स्वतःचा " स्टड फार्म " ही आहे. रिसोर्टमधील रूम जुन्या काळातील डेकोरेटिव्ह फर्निचरने उत्कृष्ट पद्धतीने सजविलेल्या आहेत. गायकवाड कुटुंबाची स्पेशालिटी असलेल्या मटन / मासे लोणचे, परसुंदी, पांढरा रस्सा , वडे, काळा रस्सा, कोळंबी, धनसक, कबाब आणि भरपूर शाकाहारी पदार्थ अशा लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेता येईल.


गायकवाड कुटुंबाच्या जेवणाची बऱ्याच राजेशाही घराण्यांनी दिली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, महाराज ऑफ वानकानेर, राजकोट, स्वेद, पन्ना, सातारा आणि फलटण या घराण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर स्वर्गीय पंतप्रधान मा. श्री. राजीव गांधी आणि कृषिमंत्री मा. श्री. शरद पवार यांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेवून जेवणास पसंदी दिलेली आहे. इथे आपणांस घोडेस्वारी, अत्याधुनिक बंदुकांच्या सहाय्याने नेमबाजी आणि विशेष प्रसंगी जंगल सफारीचा आनंद घेता येईल. रिसोर्टमध्ये आपणांस छोट्या/मोठ्या, पार्टीज्, वाढदिवस, स्वागत समारंभ, गेट टुगेदर, छोट्या सभा किंवा ऑफिस मीटिंग्ज आयोजित करता येतील.